
अमळनेर:- तालुक्यातील वावडे येथे मारवड पोलिसांनी छापा टाकून गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सपोनि जयेश खलाणे यांना मिळालेल्या माहितीनुसार पोहेकॉ फिरोज बागवान, पोहेकॉ भरत इशी व पो. कॉ. उज्वल पाटील यांनी वावडे येथे छापा टाकला असता दीपक संतोष भील यास त्याच्या घराच्या मागे विहिरीजवळ गावठी दारुची हातभट्टीद्वारे दारू पाडताना रंगेहाथ मिळून आला. त्याठिकाणी २००० रुपये किमतीचे ५० लिटर कच्चे रसायन, व १५ लिटर तयार दारू आदी मुद्देमाल आढळून आला. नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा जागीच नाश करण्यात आला. आरोपीविरुद्ध मारवड पोलीसात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ फ, ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.







