
अमळनेर-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे हे आज दिनांक 11 सप्टेंबर गुरुवार रोजी अमळनेरात येत आहेत.
दुपारी 1.30 वाजता मंगलमूर्ती चौकातील शिव पेट्रोल पंप जवळील हॉलमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने त्यांचा स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांनी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष डी एम पाटील व शहराध्यक्ष प्रशांत निकम यांनी केले आहे.

