अमळनेर:- तालुक्यातील गलवाडे येथे मारवड पोलिसांनी छापा टाकून गावठी दारू विकणाऱ्या महिलेवर कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सपोनि जयेश खलाणे यांना मिळालेल्या माहितीनुसार सफौ किशोर पाटील, पो. कॉ. प्रशांत पाटील, पो. कॉ. सचिन निकम यांनी गलवाडे येथे भेट दिली असता उषाबाई प्रकाश भील ही भिल्ल वस्तीत घराच्या आडोश्याला स्टीलचा हंडा व प्लास्टिक पिशवी घेवून बसलेली दिसून आली. तिच्यावर छापा टाकला असता पोलिसांची चाहूल लागल्याने सदर महिला पळून गेली. त्याठिकाणी 13 लिटर दारुसह एकूण 1500 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा जागीच नाश करण्यात आला. आरोपीविरुद्ध मारवड पोलीसात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे. कॉ. किशोर पाटील हे करीत आहेत.