अमळनेर :- तालुक्यातील मांडळ येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची २९७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
आझाद चौक येथे तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र धनगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या जयंतीच्या कार्यक्रमात मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. तसेच उपसरपंच हंसराज मोरे, सदस्य सुरेश कोळी, विजय कोळी आदींनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजा केली. तसेच राजेंद्र धनगर यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. त्यानंतर ट्रॅक्टरवर अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा ठेवून गावात डी जे वर मिरवणूक काढण्यात आली यावेळी मा सरपंच अशोक कोळी, सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब कोळीसह संजय रघुनाथ धनगर, महेश धनराज पवार,दिपक दगडू धनगर, मच्छिंदर धनराज पवार, चैत्राम सखाराम धनगर, देविदास नवल धनगर, दीपक काशिनाथ बडगुजर सह शेकडो नागरिक उपस्थित होते.