अमळनेर येथे उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन…
अमळनेर:- येथील ऑल इंडिया मजलीस ऐ इत्ताहादुल मुस्लिमीनच्या वतीने भाजपच्या नेत्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्मांचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात अपशब्द वापरले म्हणून त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोंविदजी यांना देण्यात आले.
भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्मांचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी अपशब्द वापरले व संपूर्ण जगातील मुस्लिम बांधवांची भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे नुपूर शर्मा यांच्या विरोधात कडक व सक्तीची कारवाई करून तात्काळ अटक करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी एआयएमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष हाजी सईद शेख, उपाध्यक्ष कलीम शेख, हाजी नसीरोदीन शेख, अल्ताफ राजा, अल्तमश शेख, आकीब सैय्यद, मुस्तकिम मान्यार ,कलीम शेख, शाहिद सह आदि उपस्थित होते.