
अमळनेर:- शहरातील धुळे रोड परिसरात दुचाकीने जाणाऱ्या एकास धोकेदायक मांज्यामुळे गंभीर दुखापत झाल्याची काल मकर संक्रांतीच्या दिवशी घडली.
शहरातील पान खिडकी भागातील रहिवासी असलेले चंद्रशेखर भावसार हे दुचाकीने धुळे रोडवरून जात असताना नायलॉन मांजा कान व ओठावर घासला गेल्याने ओठ फाटले व गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेचे वृत्त सोशल मीडियावर आल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली. शहरातील वेगवेगळ्या भागातून नायलॉन मांजा जप्त करण्यात आल्याचे समजते. मात्र घटना घडल्यानंतर प्रशासनाची कारवाई हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याचे दिसून आले.







