अमळनेर :- तालुका मराठा समाज अमळनेर या कार्यकारी मंडळाची सन २०२२ – २०२७ पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात आली असुन निवडणूक अधिकारी म्हणुन जयवंतराव मनसाराम पाटील यांनी कामकाज पाहिले व दि ५ रोजी संचालक मंडळांची यादी जाहीर केली.
सदर निवडणूक प्रक्रियेत आ. अनिल भाईदास पाटील, माजी आ. कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्ष विनोद राजधर पाटील,अँड. व्ही.आर. पाटील, माजी नगरसेवक संजय कौतिक पाटील, गोकुळ बोरसे यांची समिती गठित करण्यात आली होती तर मराठा समाजातील सुमारे ६० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यात १५ संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली. यात जयवंतराव मन्साराम पाटील, शिवाजी मोहन पाटील, मनोहर छबु पाटील, संजय पुनाजी पाटील, विक्रांत भास्करराव पाटील, कैलास रामदास पाटील, जयप्रकाश रामदास पाटील, पत्रकार चंद्रकांत प्रभाकर काटे, स्वप्नील वसंतराव पाटील, प्रविण श्रीराम पाटील, पत्रकार संजय कृष्णा पाटील, महेंद्र शालीग्राम बोरसे, गौरव उदय पाटील, संजय शालीग्राम पाटील, डॉ.सुमित अशोक पाटील, भुषण संजय भदाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर कायम आमंत्रित सदस्य म्हणून आ.अनिल भाईदास पाटील,माजी आ. गुलाबराव वामनराव पाटील, माजी आ डॉ. बी. एस. पाटील, माजी आ. कृषिभुषण साहेबराव पाटील, माजी आ.श्रीमती स्मिता उदय वाघ, माजी प्र. कुलगुरु प्रा. शिवाजी अवचित पाटील,माजी नगराध्यक्ष विनोद राजधर पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील, माजी नगराध्यक्ष प्रभाकर नारायण पाटील हे राहणार आहेत.