
अमळनेर:- तालुक्यातील प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी १२ वीच्या परीक्षेत यश संपादन करत उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.

१२ वी विज्ञान शाखेत ९१.८३% गुण मिळवत अर्पिता राजेश भंडारी ही प्रथम, ९०.५०% मिळवून हर्षदा गणेश सूर्यवंशी ही द्वितीय, तर ८८.८३% टक्के गुण मिळवून प्राची संजय शिंदे व टिषा राजेश पवार यांनी संयुक्त पणे तिसरा क्रमांक पटकावला आहे.

कला शाखेत प्रथम स्नेहल गोकुळ पाटील हिने ८७.१६%, द्वितीय निकिता सुहास पाटील ८६.६६%, तृतीय पूजा हरीलाल पाटील हिने ८४.३३% गुण मिळवले आहेत.

वाणिज्य शाखेत ९४.१६% गुण मिळवून वर्धान मनीष शाह प्रथम, ९४.००% मिळवून कांचन जितेंद्र अग्रवाल द्वितीय, ९२.६७% मिळवून किंजल जितेंद्र भंडारी हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

किमान कौशल्य शाखेत लोकेश गोपाल पाटील, दुर्गेश विक्रम पाटील, मनोज संजय जाधव यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले आहेत. तसेच किमान कौशल्य शाखेत जय प्रवीण माळी, आमित विद्याधर माळी, विधान विलास झाल्टे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खा.शि. मंडळाचे चेअरमन हरी भिका वाणी, व्हॉईस चेअरमन योगेश मुंदडे, सर्व संचालक मंडळ तसेच प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. शिरोडे, प्रा.डॉ. ए.बी. जैन, उपप्राचार्य प्रा. यू.जी.मोरे यासह प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने अभिनंदन केले आहे.




