
सर्वांना सहज उपलब्ध असणाऱ्या नेतृत्वाला अमळनेरकरांची पसंती…
अमळनेर – नगरपरिषद निवडणुकीमुळे वातावरण दिवसेंदिवस तापत असताना, अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांना शहरात प्रचारादरम्यान उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सामान्य कुटुंबातून मोठ्या संघर्षातून पुढे आलेले, पत्रकारितेच्या माध्यमातून अन्यायाला नेहमी धाडसाने वाचा फोडणारे आणि सर्वसामान्यांचा आवाज बनून अनेक वर्षे काम करणारे जितू ठाकूर यांना सर्वच स्तरातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

शहरातील विविध भागात सुरू असलेल्या प्रचारादरम्यान जितू ठाकूर यांना नागरिकांचा स्वयंस्फूर्त, प्रचंड आणि सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे. जितू ठाकूर हे सामान्य परिस्थितीतून वर आलेले तरुण नेतृत्व असून अनेक गरजूंना मदतीचा हात देणारे, मनाने श्रीमंत व्यक्तिमत्त्व आहे. मित्रांचा मोठा गोतावळा त्यांच्या भोवती असून प्रत्येकाशी आपुलकी जपणारे व सर्वांना आपलेसे वाटणारे व्यक्ती आहेत. यामुळेच शहरातील तरुण वर्ग, महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, कामगार, तसेच सर्वसामान्य मतदार त्यांच्याकडे आशेने पाहत असल्याचे चित्र दिसत आहे. “अमळनेर बदलूया, आपल्यातीलच माणसाला संधी देऊया!” हा नारा आता सर्वसामान्यांच्या तोंडी ऐकू येत आहे.
सर्वांना सहज उपलब्ध असणारे नेतृत्वाला पसंती…
अमळनेर शहरातील स्थानिक, सर्वांना सहज उपलब्ध राहून समस्यांना भिडणारे आणि विकासासाठी स्पष्ट दृष्टी असणारे नेतृत्व हवे असल्याचे मत बहुसंख्य नागरिकांनी व्यक्त केले असून, या पार्श्वभूमीवर जितू ठाकूर यांची दावेदारी अधिक बळकट होताना दिसत आहे.




