
शेतकऱ्यांनी व्यक्त केली प्रचंड नाराजी, मात्र सभापती आणि संचालक मंडळाने काढला सुवर्णमध्य…
अमळनेर : कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया सीसीआय केंद्राचा शुभारंभ होऊनही आर्द्रता जास्त असल्याने फक्त दोन ट्रॅक्टर कापूस खरेदी झाला. शेतकऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली मात्र सभापती आणि संचालक मंडळाच्या मध्यस्थीने मार्ग काढून आणलेला कापूस जीन मध्येच सुकवून तो खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अमळनेर बाजार समितीला सीसीआय केंद्र मंजूर झाले. उद्घाटन प्रसंगी खासदार स्मिता वाघ , मंत्री अनिल पाटील मार्केट संचालक अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्या स्लॉ ट मध्ये दहा ट्रॅक्टर आले. मात्र गुणवत्ता नसल्याने तसेच कापसाला आर्द्रता जास्त असल्याने दोन ट्रॅक्टर वगळता इतरांना नाकारण्यात आले. १५ क्विंटल ९० किलो कापूस मोजला गेला. शेतकरी सकाळपासून केंद्रावर उपाशीपोटी येऊन बसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया अधिकारी योगेश राजपूत थाळनेरकर (गेडरप्रत वारीकर )खरेदी केंद्रवर शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तर देत असल्याने शेतकरी चिडले होते. चार वाजेपर्यंत एकही ट्रॅक्टर मोजण्यात आलेले नव्हते. सकाळपासून शेतकरी उपासमारी या ठिकाणी सर्व सर्व पदाधिकाऱ्यांना फोन लावून सीसीआय केंद्रावर ती बोलवले आहे पण कोणीही येण्यास तयार नव्हते. अखेरीस सभापती अशोक पाटील ,संचालक प्रा सुभाष पाटील , भोजमल पाटील यांनी लामा जीन मध्ये जाऊन चर्चा केली. काही शेतकऱ्यांचा कापूस गुणवत्ता नसलेला आहे तर काही कापसाला १६ च्या वर आर्द्रता होती. सीसीआय च्या नियंमाप्रमाणे फक्त ८ ते १२ टक्के आर्द्रता असणे आवश्यक आहे. अखेरीस संचालक मंडळाने जास्त आर्द्रता असलेला कापूस जीन मध्येच सुकवावा आणि नन्तर मोजून घेण्याचे ठरले.
शेतकऱ्यांनी स्लॉट मंजूर झाल्यावरच ट्रॅक्टर आणावे , आर्द्रता कमी असलेला आणि गुणवत्ता असलेला कापूस आणावा. – अशोक पाटील , सभापती ,कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर.




