
अमळनेर: श्रीमंत प्रताप शेठ यांच्या १४६ व्या जयंतीनिमित्त प्रताप महाविद्यालयात त्यांच्या स्मृतिचिन्हास – छायाचित्रास माल्यार्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही जयंती उत्साहात व श्रद्धेच्या वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीमंत प्रतापशेठ यांच्या प्रतिमेला निवडणूक उपसमिती चेअरमन श्री.पंडित रामचंद्र चौधरी , खानदेश शिक्षण मंडळाचे चिटणीस तथा उपप्राचार्य प्रा. पराग पाटील , महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एच.डी. जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून झाली.
स्व. प्रताप शेठ हे परिसरातील शिक्षण, समाजकारण व दातृत्व यासाठी ओळखले जाणारे व्यक्तिमत्त्व होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम व परवडणारे शिक्षण देण्याचा त्यांचा दृढ संकल्प होता. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच प्रताप महाविद्यालयाची स्थापना झाली आणि अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली.
शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच त्यांनी सामाजिक उपक्रम, गरीब विद्यार्थ्यांची मदत, शैक्षणिक व वैद्यकीय सुविधा उभारणे, तसेच परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योगदान दिले. त्यांच्या दातृत्व, मनमिळाऊ स्वभाव आणि समाजासाठी असलेल्या निस्वार्थ वृत्तीमुळे ते सर्वांच्या मनात आजही आदराने स्मरणात आहेत.
याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.डॉ.अशोक पाटील,प्रा.डॉ.योगेश तोरवणे, प्रा.डॉ.विजय मांटे, IQAC समन्वयक प्रा.डॉ.मुकेश भोळे, प्रा.डॉ.कुबेर कुमावत, प्रा.डॉ.कैलास निळे, प्रा.डॉ. शानाभाऊ बागुल, प्रा.डॉ.जितेंद्र पाटील, प्रा.विजय साळुंखे, प्रा.डॉ.तुषार रजाळे, प्रा.डॉ.भरतसिंग पाटील, प्रा.यु.जी.मोरे, प्रा.वसंत पाटील, प्रा.किरण पाटील, प्रा.सोनूसिंग पाटील, प्रा.पावरा, महाविद्यालय कुलसचिव श्री.राकेश निळे, कार्यालय अधीक्षक श्री.देवेंद्र कांबळे, श्री.जयदेव भदाणे, श्री.बापू पाटील,श्री. अजय साटोटे,श्री.कमलाकर पाटील, श्री.धना भोई, श्री.महेंद्र पाटील श्री.शर्मा यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व उपस्थितांनी पुष्प अर्पण करून शेठजीना अभिवादन केले.

