
पत्नी, प्रियकर आणि प्रियकराच्या आई विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
अमळनेर : पत्नीला तिच्या प्रियकरासोबत नग्न अवस्थेत पाहिल्याने पतीला तू माणसात नाही असे हिणवल्याने पतीने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना २९ रोजी पहाटे घडली होती. पत्नी , प्रियकर आणि प्रियकराच्या आई विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२९ रोजी एका इसमाने धावत्या रेल्वे खाली पोलिसात आत्महत्या केल्याने अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. त्यांनतर ओळख पटल्यावर तो रुबजी नगर मधील सुनील श्रावण भोई असल्याचे समजले.
त्याचा भाऊ सागर याने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, सुनील श्रावण भोई रा रुबजी नगर हा मध्यरात्री ३ वाजता उठला असता त्याला त्याची पत्नी दीपाली सुनील भोई व अजय छोटू भोई नग्न अवस्थेत आढळून आले. त्यात त्याने पत्नीला शिवीगाळ सुरू केली तेव्हा दीपाली व अजय भोई त्याला तू माणसात नाही काहीच कामाचा नाही , जगायची लायकी नाही. मरून गेला तरी चालेल असे हिणवत होता. त्यांनंतर अजयची आई सुरेखा छोटू भोई आली आणि तिने पण त्याला तसेच हिणवले. त्याने रागाच्या भरात मोटरसायकल काढली आणि टाकरखेडा जाणाऱ्या रेल्वे रुळावर झोकून देत रेल्वे खाली आत्महत्या करन घेतली. त्याचे डोके आणि शरीर असे तुकडे झाले होते. सुनील च्या मृत्यूस पत्नी दीपाली, तिचा प्रियकर अजय भोई आणि त्याची आई सुरेखा भोई जबाबदार असल्याने तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता १०८,३३३ , ३५१(२),३५२ ,३(५) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून अजय याला पोलिसांनी अटक केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.




