
अमळनेर:- तालुक्यातील दोधवद येथे मारवड पोलिसांनी छापा टाकून गावठी दारू विक्री करणाऱ्याला रंगेहाथ पकडले आहे.
सपोनि जयेश खलाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार हे.कॉ. सुनील अगोने, हे.कॉ. संजय पाटील, पो.ना. सुनील तेली यांनी दोधवद येथे छापा टाकला असता लोटन अभिमान सैंदाणे हा राहत्या घराच्या समोर मोकळ्या सार्वजनिक जागेत प्लास्टिक ड्रम घेवून दारू विक्री करताना रंगेहाथ आढळून आला. त्याचेकडून १२०० रुपये किमतीची ३० लिटर गावठी दारू मिळून आली. नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा जागीच नाश करण्यात आला. मारवड पोलीसात दारूबंदी अधिनियम ६५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.







