आधार संस्था व अमळनेर मानवी हक्क समिती मार्फत आयोजन…
सागर मोरे
अमळनेर:- नुकतेच सेक्सवर्कर लैंगिक कामगारांच्या हक्कांबाबत भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देश जारी केले आहेत. त्याविषयी अमळनेर येथील देहविक्रय करणाऱ्या व्यावसायिक महिलांसाठी प्रबोधन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
सत्राच्या सुरुवातीला संस्थेकडून व महिलांकडून अमळनेर मानवी हक्क समितीचे अध्यक्ष रविंद्र मोरे, उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत, सचिव संदीप घोरपडे, प्रसिद्धी प्रमुख शिवाजी पाटील, प्रसिद्धी प्रमुख मनोज शिंगाणे यांचे स्वागत करण्यात आले. डॉ.भारती पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले. अनेक वर्षापासून सुरू असलेल्या लढाईचा हा विजय असून 18 वर्षावरील ज्या महिला स्वेच्छेने हा व्यवसाय करू इच्छितात त्याकरता सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा खूप मोठा दिलासा आहे. या महिला आता अधिक सन्माननीय जीवन जगू शकतील असे सांगितले. समितीचे सचिव संदीप घोरपडे यांनी पौराणिक दाखला देत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सविस्तर चर्चा केली व महिलांनी कायद्याची आपल्या हक्काची माहिती करून घेत न घाबरता परिस्थितीचा सामना करावा असे सांगितले समितीचे उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत यांनी मुलांच्या शिक्षणा विषयी माहिती दिली. एस एन पाटील व मनोज शिंगणे यांनी महिलांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. अमळनेर मानवी हक्क समितीचे अध्यक्ष रवी मोरे यांनी तुमच्या मानवी हक्काबाबत काहीही प्रश्न उपस्थित झाला तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यावेळी केले. आधार संस्थेच्या अश्विनी भदाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला आधार संस्थेचे मयूर गायकवाड, कल्पना सूर्यवंशी, यास्मिन शेख, तोसिफ शेख, रंजू जैन,नंदिनी चौधरी, फरीदा काजी, अनिता बडगुजर, आराज सय्यद यांचे अनमोल सहकार्य लाभले.