विविध योजना व विषयांबाबत शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन…
अमळनेर:- तालुक्यातील गोवर्धन बोरगाव ग्रामपंचायत कार्यालयात येथे दि. २५ जून रोजी सकाळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून मंडळ कृषी अधीकारी अविनाश खैरनार, कृषी पर्यवेक्षक योगेश वंजारी होते. सदर कार्यक्रमात राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस पिकाचे उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकसित करणे या योजनेअंतर्गत समूह बांधणी व क्षमता बांधणी कार्यक्रम तसेच समूहातील शेतकऱ्यांना एकत्रित निविष्ठा खरेदी करणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कापूस पिकामध्ये कडधान्य आंतरपिके घेऊन उत्पादन वाढ तंत्रज्ञान प्रचार व प्रसार बाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच बीज प्रक्रिया, बियाणे उगवण क्षमता तपासणी, प्रमुख पिकांची लागवड व त्यामध्ये पिकांची फेरपालट याबाबत, शेतीशाळा पीक प्रात्यक्षिक, बांधावर खत वाटप, कीड व रोग याबाबतचे व्यवस्थापन, बिबिएफ व्दारे पेरणी बाबत तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड, कृषी ॲप बाबत मार्गदर्शन करण्यात आले.