
अमळनेर:- अमलेश्वर नगर गोळीबार प्रकरणातील आरोपी भूषण याला २ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून मयत अरुण महाजन यांचे शव जळगाव येथे तपासणीसाठी नेण्यात आले होते.

मयत अरुण महाजन यांच्या छातीत गोळी अडकल्याने त्यांची कलर डॉप्लर सोनोग्राफी करावी लागणार होती. अमळनेरला सुविधा नसल्याने शव जळगाव येथे नेण्यात आले होते. तर आरोपी भूषण याला अमळनेर न्यायालय सुटीवर असल्याने पोलिसांनी पारोळा कोर्टात हजर केले होते. न्या हलगुडे यांनी आरोपी भूषण याला २ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.




