
कार्यक्रमासाठी अभिनेत्री अलका कुबल यांच्यासह विविध मान्यवर राहणार उपस्थित…
अमळनेर:- शहरातील नोबल पोदार स्कूलच्या नव्या कॅम्पसचा उद्घाटन सोहळा तसेच वार्षिक बक्षीस वितरण समारंभ आज रविवार, २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम गलवाडे रोडवरील पोदार कॅम्पस, स्वादिष्ट नमकीन जवळ आयोजित करण्यात आला असून शहरातील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून अभिनेत्री अलकाताई कुबल उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यक्रमाला खासदार स्मिताताई वाघ, आमदार अनिल पाटील, आमदार अमोल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार असून सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून डॉ. अर्चना सूर्यवंशी (अध्यक्षा) व प्रशांत सूर्यवंशी (डायरेक्टर) यांनी पालक, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.




