13 पैकी तब्बल 11 जागांवर मिळवला विजय…
अमळनेर:- पाच गावांचा विस्तार असलेल्या तालुक्यातील सर्वाधिक मोठ्या अमळगाव वि. का. सोसायटी निवडणुकीत आमदार अनिल पाटलांच्या नेतृत्वातील शेती सेवा पॅनलचा दणदणीत विजय झाला असून या पॅनलने 13 पैकी तब्बल 11 जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
सर्वाधिक मोठी आणि आमदार अनिल पाटील यांच्या हिंगोने गावाचा समावेश असलेली ही सोसायटी असून यात अमळगांव, खेडी खुर्द, खेडी सिम, मेहेरगांव ,दोधवद, हिंगोणे इ गावे समाविष्ट आहेत,यामुळे संपुर्ण तालुक्याचे याकडे लक्ष लागून होते. तसेच निवडणूक देखील चुरशीची झाली दि 26 रोजी मतदान होईन त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी करण्यात आली. यात विरोधी पॅनल ला फक्त 2 जागांवर समाधान मानावे लागले. विजयी उमेदवारांचे आ. अनिल पाटील यांनी अभिनंदन केले.
हे आहेत विजयी उमेदवार
ईंजी. गिरीश सोनजी पाटील अमळगांव (जनरल), मिलिंद गुलाबराव पाटील अमळगांव (ओबीसी), राजेंद्र साहेबराव पाटील खेडी सिम (जनरल), रावसाहेब देवीदास पाटील खेडी खुर्द (जनरल ), डॉ.संजय भाऊराव पाटील खेडी सिम (जनरल), ज्ञानेश्वर आनंदा शिंदे खेडी खुर्द (एनटी), सौ.प्रभावती आनंदसिंग पाटील दोधवद (महिला राखीव), हिंमतराव गटलू पारधी अमळगांव (एस सी/एस टी), प्रवीण दगाजी पाटील हिंगोणे (जनरल), सुभाष शालीकराव पाटील अमळगांव (जनरल), संजय माधवराव चौधरी अमळगांव (जनरल).
सदर पॅनलच्या विजयासाठी अमळगाव येथील उदय नंदकिशोर पाटील, नंदकिशोर व्यंकट पाटील, महेंद्र रमेश पाटील (भटुभाऊ), भोई, अॅड.व्ही.आर.पाटील, परमार वकील , लक्ष्मण व्यंकटराव पाटील, निलेश लक्ष्मण पाटील, उल्हास सोनजी पाटील, मुरलीधर भाकचंद पाटील, भिकन दाजी, सुरेश निंबा पाटील, रविंद्र शालिक पाटील, हंसराज पाटील, राहुल हंसराज पाटील, घनश्याम पाटील, बापू चौधरी, छोटू चौधरी, राकेश चौधरी, शिवाजीराव चौधरी, भगवान रामदास पाटील, दिपक एकनाथ पाटील, अक्षय मिलिंद पाटील, सौ.वंदना हंसराज पाटील, भैय्यासाहेब पाटील, खेडी येथील पद्माकर पाटील, ज्ञानदेव पाटील (सरपंच), बाळू पाटील, हिरालाल पवार, प्रभाकर पाटील, विलास दयाराम शिंदे, प्रा.श्याम पवार, प्रल्हाद पाटील, एम. एस. पाटील, गंभीर शिंदे, भास्कर पाटील, आबासाहेब पाटील. मेहरगाव येथील एस.व्ही.पाटील , घनश्याम पाटील, प्रवीण पाटील , पिरण बापू, भिकण आबा, दिलीप टेलर, रामभाऊ पाटील, सी.जी.भाऊसाहेब,हिंगोणे येथील बापू पाटील, दादु पाटील प्रभाकर संतोष पाटील, बंडू पाटील, कोळी दादा पोलिस पाटील, दोधवद येथील अॅड.व्हि.आर. पाटील, रवा पाटील, सरपंच श्री भोई भुरा भाऊ, गवरलाल भोई, पिरु राजपुत,अँड दीपेन परमार, धोंडु पाटील तसेच अमळगांव, खेडी खुर्द, खेडी सिम, मेहेरगांव, दोधवद, हिंगोणे येथील सर्व मतदार आणी ग्रामस्थ बंधु भगिनी यांनी सहकार्य केले.