तृणधान्याच्या उपयोगितेची विद्यार्थ्यांमध्ये केली जनजागृती…
अमळनेर:- संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे अमळनेर तालुका कृषी विभाग, साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय व साने गुरुजी कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने, भोगी सणानिमित्त उपस्थित महिला भगिनींच्या हस्ते सप्त धान्याचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिव संदीप घोरपडे प्रमुख वक्त्या म्हणून डॉक्टर मंजिरी कुलकर्णी व प्रवीण पाटील होते. पौष्टिक तृणधान्य दिन कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील पाटील, सूत्रसंचालन डी ए धनगर तर आभार मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष या संकल्पनेअंतर्गत ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, सावा व राजगिरा आदी पिकाच्या उत्पादन वाढीबरोबर या पिकांचे आरोग्यविषयक फायद्यांबाबत जनजागृती करून लोकांच्या आहारातील त्यांचे प्रमाण वाढवणे हा हेतू ठेवून आज विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना डब्यात तृणधान्यांनी बनवलेले पदार्थ आणायला सांगितले होते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी त्याप्रमाणे डबे आणले होते. मधल्या सुट्टीत सर्व विद्यार्थ्यांनी तृणधान्यांच्या डब्यांचे सेवन केले. तृणधान्यांचे पोषणमूल्य व त्यांचे मानवी आहारातील महत्त्व विशद करण्यासाठी आहार तज्ञ डॉक्टर मंजिरी कुलकर्णी, कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप घोरपडे, कृषी पर्यवेक्षक प्रवीण पाटील यांची यथोचित भाषणे झाली. तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेत साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातून प्रथम लोकेश पवार, द्वितीय भूपेश कोळी, तृतीय निखिल ठाकरे तर उत्तेजनार्थ पारितोषिक निलेश पाटील व गिरीश पाटील यांना मिळाले. साने गुरुजी कन्या हायस्कूल मधून प्रथम जान्हवी पाटील, द्वितीय यामिनी पाटील, तृतीय डींपल ठाकरे तर उत्तेजनार्थ पारितोषिक प्रियंका पाटील व जान्हवी पाटील यांना मिळाले. चित्रकला स्पर्धेत गौरव पवार तर वकृत्व स्पर्धेत भूपेश कोळी यांना पारितोषिक मिळाले. व्यासपीठावर कृषी पर्यवेक्षक योगेश वंजारी, कृषी पर्यवेक्षक दीपक चौधरी व प्रवीण पाटील, हजर होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप घोरपडे यांनी आहारात तृणधान्याचा उपयोग करून शरीर तंदुरुस्त राखणे विषयी मार्गदर्शन केले.
कृषी सहाय्यक निलेश पाटील, महेंद्र पवार, अजय पवार, किरण पाटील, निशा सोनवणे, नम्रता बागुल सुप्रिया पाटील, पूनम पाटील, मालू बेडसे, नलिनी पाटील, विद्या पाटील, कविता बोरसे, शितल पाटील आत्मा योजनेचे भूषण पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.