
अमळनेर – तालुक्यातील टाकरखेडा येथे दि १७ रोजी दुपारी २ ते २.३० दरम्यान शॉटसर्किट मुळे सुमारे साडेतीन बिघे जमिनीवरील मक्याला आग लागून सुमारे दिड लाखाचे नुकसान झाले आहे.

टाकरखेडा येथील शेतकरी कैलास आत्माराम पाटील यांच्या साडेतीन बिघे शेतातील मका दुपारी शॉट सर्किट मुळे जळून खाक झाला आहे त्या ठिकाणी शेतकरी नितीन कैलास पाटील,अमोल संजय पाटील, सतीश सुरेश पाटील,मनोहर विश्वास पाटील,संजय शिवाजी पाटील आदींनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला.त्यानंतर महावितरण कंपनीचे सखाराम भिल,पंकज पाटील,तलाठी प्रफुल्ल पाटील,कृषिसहाय्यक श्री. सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली व नुकसानीचे फोटो काढले.
सदर घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन त्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी शेतकरी कैलास पाटील व गावकऱ्यांनी केली आहे.




