
अमळनेर:- तालुक्यातील गलवाडे ते जैतपीर गावादरम्यान एसटी व पीकअपची धडक होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नसली तरी पिकअप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रकांत मोतीलाल पटेल (चालक राज्य परीवहन महामंडळ शिदखेडा आगार) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, १८ रोजी ते प्रवासी घेऊन जळगाव शिंदखेडा बसने जात असताना सकाळी 08.15 वाजेच्या सुमारास जैतपीर ता. अमळनेर शिवारातील गलवाडे गावाचे पुढे हनुमाण मंदीराजवळ रोडवर बस चालवित असतांना समोरुन येणारी पांढऱ्या रंगाची महेद्र पिकअप गाडी क्रंमाक एम. एच. 04 एच. एस. 0061 वरील चालक विश्वास भरत पाटील रा. (माळपिंपरी) याने भरधाव वेगाने समोरुन येवुन ड्रायव्हर साईडने जोराची धडक दिली चालक व वाहक तसेच प्रवासी असे बसच्या खाली उतरुन बस पाहत असतांना तेथे गावातील इतर लोक जमा झाले. यावेळी कोणालाही दुखापत झाली नसल्याने चालक व वाहक दोघांनी एसटी बसची पाहणी केली असता एस.टी. बस च्या ड्रायव्हर साईडचे पुढील बंफरला तसेच हेड लाईच जवळ व पत्रा दाबला गेला आहे. व पिकअप गाडीचे बंफर व ईजीनचे नुकसान झालेले आहे. याप्रकरणी पिकअप चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेकॉ संजय सुर्यवंशी हे करीत आहे.




