
अमळनेर : बांधलेल्या घराचे पैसे मागायला गेलेल्या मिस्तरीला दोघांनी त्याच्या घरी जाऊन मारहाण करून शिवीगाळ केल्याची घटना २३ रोजी सायंकाळी ७ वाजता टाकरखेडा येथे घडली.

कांतीलाल शालीक पाटील रा टाकरखेडा यांनी त्यांच्या घराचे काम भिकन सुलतान पिंजारी याला बांधायला दिले होते. मात्र बांधकामाचे ठरलेले पैसे दिले नाही म्हणून भिकन मागायला गेला त्याचा राग येऊन कांतीलाल आणि त्याचा शालक दोघांनी भिकनच्या घरी जाऊन त्याला मारहाण केली. भिकन च्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्यायासंहिता कलम ११५(१)२) , ३५१(२) ,३५२ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास योगेश बागुल करीत आहे.




