
अमळनेर : लहान मुलांचे भांडण आवरायला गेलेल्या गणेश पांडुरंग माळी याना जगदीश मगन महाजन यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याची घटना २१ रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास अमलेश्वर नगर माळीवाडा भागात घडली.

गणेशने अमळनेर पोलीस स्टेशनला फॉरयाद दिल्यावरून भारतीय न्याय संहिता कलम २९६, ११५(२) , ३५१(२) ,३५२ प्रमाणे जगदीश विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास नितीन मनोरे करीत आहेत.




