
अमळनेर: महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल २०२६ ची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि मंडळाकडून आज इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. निकालाची घोषणा प्रथम सकाळी ११ वाजेच्या सुमारास पत्रकार परिषदेत घेण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना mahahs scboard.in या अधिकृत वेबसाइट वर जाऊन आपला निकाल पाहता येणार आहे.

महाराष्ट्र बोर्ड १२वीचा निकाल कसा तपासावा ?
महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट, mahahsscboard.in ला भेट द्या. होमपेजवरील ‘एचएससी परीक्षा निकाल २०२६’ (HSC Examination Result 2026) या लिंकवर क्लिक करा. तुमचा रोल नंबर (सीट नं.) आणि आईचे पहिले नाव टाका. (जर अर्जामध्ये तुमच्या आईचे नाव दिले नसेल, तर ‘XXX’ टाका.) ‘निकाल पहा’ (View Result) टॅबवर क्लिक करा. महाराष्ट्र बोर्ड १२वी निकाल २०२६ स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील संदर्भासाठक्ष तो डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट-आउट घ्या.
महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल खालील अधिकृत वेबसाइट्सवर पाहता येईल: mahresult.nic.in, mahahsscboard.in, hscresult.mkcl.org, results.digi-locker.gov.in (डिजीलॉकर).




