
अमळनेर : १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त येथील शासकीय कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडला. माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता ध्वजारोहन करण्यात आले.

यावेळी उपस्थितांनी ‘वंदे मातरम्’, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र राज्य गीत गायन करून राष्ट्राभिमान व्यक्त केला.
कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, नायब तहसीलदार अजय कुलकर्णी तसेच निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत धमके यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात महाराष्ट्राच्या स्थापनेचा इतिहास, राज्याच्या प्रगतीतील योगदान आणि नागरिकांची भूमिका यावर भाष्य करण्यात आले.
महाराष्ट्र दिनानिमित्त परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमला असून, उपस्थितांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.




