
अमळनेर :- बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.त्यात अमळनेर तालुक्यात परीक्षेसाठी बसलेल्या ३ हजार ३०५ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार १७७ विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा एकूण निकाल ९६.३६ टक्के लागला आहे.मागील वर्षी बारावीचा निकाल ९५.८३ टक्के होता. ह्या वर्षी बारावी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ०.८ टक्क्यांनी वाढली आहे.

आठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात प्रताप महाविद्यालय कला विभाग , श्री दत्त विद्यामंदिर पातोंडा, श्री.बी बी ठाकरे ज्युनिअर कॉलेज वावडे, श्री शिवाजी हायस्कुल अमळनेर, अल फाईज उर्दू गर्ल्स ज्युनिअर कॉलेज अमळनेर, यशवंत आदिवासी आश्रमशाळा पिंपळे विज्ञान विभाग, एन टी मुंदडा ज्युनिअर कॉलेज अमळनेर विज्ञान विभाग, कै.बी आर पाटील ज्युनिअर कॉलेज मारवड या विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.तर प्रताप कॉलेज अमळनेर विज्ञान विभाग ९९.७८ तर कॉमर्स विभाग ९७.४६, सावित्रीबाई फुले ज्युनिअर कॉलेज ८७.३४, के डी गायकवाड ज्युनिअर कॉलेज ८९.६५, जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय ९९.०६, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नगाव-गडखांब ६६.६६, हिरामण जीवन पाटील महाविद्यालय शिरसाळे ७६, नवभारत उच्च माध्यमिक विद्यालय दहीवद ६१.११, डी एफ साळुंखे ज्युनिअर कॉलेज मारवड ९२.१०, एन कोठारी ज्युनिअर कॉलेज कळमसरे ८५.१०, आदर्श विद्यालय अमळगांव ८५.७१, किसान माध्यमिक विद्यालय जानवे ३७.५०, आदर्श हायस्कुल मांडळ ९६.८७, कै.अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालय मंगरूळ ६६.६६, उच्च माध्यमिक आश्रमशाळा गडखाब ९३.४९, विजय नाना पाटील आर्मी स्कुल ९८.७८,
श्री एन टी मुंदडा ज्युनिअर कॉलेज ८५.७१, श्री.साई ज्युनिअर ९६.५५, गुरुकुल इंग्लिश मेडिअम आणि ज्युनिअर कॉलेज ९७.१४, प्रताप कॉलेज अमळनेर ६३.१५, आदर्श विद्यालय अमळगांव ७१.४२ टक्के निकाल लागला आहे.




