
अमळनेर :- तालुक्यातील मांडळ येथील मोटरसायकल चोरून नेल्या प्रकरणी एका संशयिताला मारवड पोलिसांनी अटक केली आहे.

पांडुरंग बुधा भील रा. मांडळ ह्यांच्या मालकीची बजाज डिस्कवर ही दुचाकी २३ रोजी रात्री चोरीला गेली होती. याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात वाल्मीक त्र्यंबक माळी व पिंटू पारधी (रा. चाळीसगाव) यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. यातील वाल्मीक माळी याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय विनोद पवार करीत आहेत.




