
अमळनेर:- दोघांचे भांडण सोडवायला गेलेल्या एकाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना ३० रोजी बोहरा येथे घडली आहे.

फिर्यादी संजय भिमराव भिल (वय 45 रा. बोहरा) हे ३० रोजी सायंकाळी ६ वाजेचे सुमारास दिलीप रामदास कोळी यांचा किराणा दुकानावर उभे असतांना बाजुला राजेंद्र वर्णेश्वर कोळी व शेखर अंतोष मेहेरे यांच्यात वादविवाद होउन भांडण सुरू होते. त्यावेळी फिर्यादीने तेथे जात शेखर व राजेंद्र यांना भांडण करु नका असे सांगुन भांडण सोडवा सोडव केली. तेव्हा शेखर हा फिर्यादीला तु घरी जा आमच्या भांडणीत पडु नको असे म्हणुन शिवीगाळ करुन मारहाण करु लागला. नंतर फिर्यादी कैलास भोजु भोई याच्या घरासमोर जावुन बसले असताना रात्री ८ वाजेच्या सुमारास शेखर अंतोष मेहरे व त्याचा मोठा भाऊ सागर संतोष मेहेरे हे दोघे शिवीगाळ करुन लागले. तु आमच्या भांडणात का पडला असे म्हणुन चापटाबुक्क्यांनी दोघांनी फिर्यादीला मारहाण करु लागले. शेखर मेहेरे याने तेथे जमिनीवर पडलेली विट उचलुन ठोसा फिर्यादीच्या डाव्या डोळ्याखाली व नाकाजवळ मारुन दुखापत केली तसेच सागर मेहेरे याने शिवीगाळ व मारहाण करुन तु कसा गावात रहातो तुला जिंवत ठेवणार नाही अशी धमकी दिली. इतरांनी फिर्यादीला मारहाणीतून सोडवत उपचारासाठी दवाखान्यात नेले. याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.फौ. संजय पाटील हे करीत आहेत.




