
मोटरसायकलस्वार गंभीर जखमी, चारचाकीही झाली पलटी…
अमळनेर : धुळ्याकडून येणाऱ्या चारचाकीने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना १ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मंगरूळ येथे एम आयडीसी पेट्रोलपंपासमोर घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की आतिक हनिफ बागवान रा कोष्टीवाडा अमळनेर हा मोटरसायकल क्रमांक एम एच १९ यु ८६१६ हिच्यावर धुळे जात असताना तो मंगरूळ पेट्रोल पंपासमोर उभा असताना धुळ्याकडून येणारी चारचाकी क्रमांक एम एच ०४ ,के एल ५००७ वरील चालकाने गाडी वेगाने आणून जोरात धडक दिल्याने मोटरसायकलसह आतिक जोरात फेकला गेला. चार चाकीने देखील ५० फुटांवर जाऊन पलट्या खाऊन रस्त्यापालिकडे घरांसमोर जाऊन पडली. आतिकच्या डोक्याला , पायाला , कमरेला मार लागला. त्याला १०८ मध्ये उपचारासाठी दवाखान्यात रवाना केले. जखमीचा भाऊ हाशिम हानिफ बागवान याने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून मोटरवाहन कायदा कलम १३४ (ब) , कलम १८४ ,भारतीय न्याय संहिता १२५ (अ) , १२५(ब) , कलम २८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे यांनी भेट दिली.




