
अमळनेर : विनाकारण शिवीगाळ करून महिलेला मारहाण व विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील धार येथे २ रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली.

एक महिला आपल्या घरातील गॅलरीमध्ये नातीला फिरवत असताना धार येथील अनिल नामदेव पाटील दारू पिऊन तिच्याजवळ गेला व शिवीगाळ करू लागला. महिलेने विचारले की तू शिवीगाळ का करतो तर त्याने तिला माझा मुलगा तुझी मुलगी पळवून घेऊन गेला मी पण कोणाला पण पळवून नेईल अशी धमकी दिली आणि महिलेचा हात धरून अंगावर ओढले अशात तिच्या कुर्त्याची बाही फाटली त्यामुळे महिलेला लज्जा उत्पन्न झाली. महिलेने मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील करीत आहेत.




