
अमळनेर : औषधी घेऊन मोटरसायकलवर परत जाणाऱ्या ढेकू येथील तरुणाला ट्रॅक्टरने धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना ६ रोजी रात्री हेडावे गावाजवळ घडली.

संचित राजेंद्र पाटील (वय १५) या दहावीत शिक्षण घेणाऱ्या मुलाच्या बकरीला कुत्र्याने चावा घेतल्याने तो ९३३३ क्रमांकाच्या मोटरसायकलवर औषधी घ्यायला आला होता. औषधी घेऊन परत जाताना हेडावे येथे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टर ने धडक दिल्याने त्याच्या डोक्याला मार लागून तो जागीच ठार झाला. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ ,उदय बोरसे ,सुनील पाटील , हेडकॉन्स्टेबल कुमावत , यश सपकाळे यांनी भेट देऊन पंचनामा केला. ट्रॅक्टर पोलिसात जमा करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.




