
सेंट मेरी शाळेची प्रांजल आनंद दुसाने ९९.४० टक्के गुण मिळवून प्रथम…
अमळनेर : इयत्ता दहावीच्या परीक्षेत अमळनेर तालुक्याचा निकाल ९१.८८ टक्के लागला असून १६ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तालुक्यातून सेंट मेरी शाळेची प्रांजल आनंद दुसाने ९९.४० टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे.

सेंट मेरी शाळेचा अथर्व बडगुजर व ग्लोबल स्कूल ची कल्याणी चौधरी यांनी ९८.४० टक्के गुण मिळवून तालुक्यात द्वितीय आले आहेत तर सानेगुरुजी नूतन विद्यालयाचा विद्यार्थी यशमीत खैरनार ९८.२० टक्के मिळवून तृतीय आला आहे.
नगरपालिका माध्यमिक विद्यालयाचा निकाल शून्य टक्के लागला असून प्रताप हायस्कूल चा ३० टक्के निकाल लागला आहे. तालुक्यातील पिबीए स्कूल , देवगाव देवळी हायस्कूल , मारवड हायस्कूल , भरवस , निम , शहापूर , कुऱ्हे , अंतुर्ली रंजाणे आश्रम शाळा , पिंपळे आश्रम शाळा, आर्मी स्कूल , ताडेपुरा , सेंट मेरी स्कूल , अंतुर्ली रंजाणे माध्यमिक विद्यालय , एन टी मुंदडा माध्यमिक विद्यालय आदी शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. सेंट मेरी शाळेच्या सहा तर एन टी मुंदडा ग्लोबल स्कूल च्या पाच विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांपेक्क्षा अधिक गुण मिळवले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक , शिक्षक ,शाळा व संस्थेतर्फे अभिनंदन होत आहे.




