
अमळनेर:- वृक्षारोपण ही काळाची गरज समजून त्यांची जतन समजून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी स्वतःचा विवाह प्रसंगी देखील आपले महत्त्वाचे कर्तव्य समजून प्र. डांगरी येथे नवदाम्पत्याने वृक्षारोपण करत सामाजिक संदेश दिला आहे.

प्र. डांगरी येथे ६ रोजी लग्न समारंभ प्रसंगी नवदांपत्य चि.वैभव आणि चि.सौ.का. कल्याणी यांनी लग्नाच्या अगोदर जोडीने बेलाचे झाड लावत अनोखा संदेश दिला आहे. यापूर्वीही नवरदेव वैभव याने जिल्हा परिषद शाळेमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक पर्यावरण पूरक उपक्रम ग्रामस्थांसोबत राबवले आहेत. पर्यावरणाचे असंतुलन, वाढले प्रदूषणावर आळा घालण्यासाठी शासन विविध अभियान राबविण्यात येतात. विवाहाच्या निमित्ताने अनेक भागातील पंचक्रोशीतील नातलग, मित्रपरिवार एकत्र येतात. त्यांना एक आदर्श म्हणून मोलाचा संदेश नवीन दाम्पत्यांनी दिला आहे. याप्रसंगी तालुक्याचे आमदार अनिल भाईदास पाटील, यांनी ही या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी सरपंच, मा.सरपंच, पोलीस पाटील तसेच गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित होते.




