
अमळनेर:- तालुक्यातील कलाली येथे ८ रोजी पहाटे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

तेजस गुलाब पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरून, ८ रोजी रात्री घरातील सर्व जण गच्चीवर झोपले होते. सकाळी ४ वाजता फिर्यादीची आई उठली असता तिला घराचा कडीकोंडा तुटलेला दिसून आला. त्यावेळी सर्वांनी घरात जाऊन पाहिले असता घरातील कपाट गायब असल्याचे लक्षात आल्याने कपाटाचा शोध घेतला असता ते फिर्यादीच्या काकाच्या घराच्या बाजूला बाहेर पडलेले होते. कपाटातील सोन्याच्या २ ग्रॅम वजनाच्या रिंगा, ६ भार वजनाचे चांदीचे जोड बेले, ४ भार वजनाचे चांदीचे ब्रेस्लेट, ५ भार वजनाच्या चांदीच्या लक्ष्मी, व ४० हजार रुपये रोख असा ६१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी मारवड पोलिसांत तक्रार दाखल केली असून पुढील तपास पीएसआय संजय श्रावण पाटील हे करीत आहेत.




