
आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते पूजन व माल्यार्पण
अमळनेर:- अमळनेर तालुका राजपूत एकता मंचतर्फे काल शुक्रवार, दि. 9 मे रोजी सकाळी हिंदू सुर्यकुल वीर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंह यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
शहरातील महाराणा प्रताप चौक येथील महाराणा प्रताप यांच्या स्मारकस्थळी हा कार्यक्रम संपन्न झाला. माजी मंत्री व आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या स्मारकाचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.यावेळी महाराणा प्रताप यांच्या शौर्याला व स्वाभिमानाला अभिवादन करत समाजबांधवांनी एकजुटीचा संदेश दिला.यावेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमला होता.उपस्थित सर्व मान्यवरांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन केले.
चेतन राजपूत यांचा झाला सत्कार

यावेळी अमळनेर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजपूत ऐकता मंचतर्फे चेतन राजपूत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास संजय पुनाजी पाटील,जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील,नगरसेवक सचिन पाटील, जितेंद्र ठाकूर,कामगार नेते एल टी पाटील, यांच्यासह राजपुत एकता मंचचे अध्यक्ष रणजित पाटील,नरेंद्रसिंग ठाकूर,अंबरसिंग पाटील,अनिल पाटील, प्रकाश पाटील,ऍड दीपेन परमार,विजयसिंग पवार,गोकुळ पाटील,अजयसिंग पाटील,दीपेन राजपूत,ओंकार राजपूत,भरतसिंग पाटील,ओंकार राजपूत,जितेंद्र पाटील,नरेंद्र पाटील,बापू पाटील,सुनिल पाटील,जयदीप राजपुत,नचिकेत महाले,केदारसिंग राजपूत,विजयसिंग पाटील,दिनेश पाटील,ज्ञानेश्वर राजपूत,विलास राजपूत,मुकेश राजपूत,जयदीप राजपूत,मनोज पाटील,सूरज परदेशी,सर्व राजपूत समाजबांधव आणि महाराणा प्रताप प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




