
अमळनेर : टँकर हळू चालवण्याचे सांगितल्याचा राग आल्याने चौघांनी दोघांना मारहाण करून लोखंडी पट्टी ने मारून जखमी केल्याची घटना ८ रोजी सकाळी १० वाजता अमळनेर पारोळा रस्त्यावर सडावण गावाजवळ नायरा पेट्रोल पपंजवळ घडली.

युवराज शंकर मोरे रा शांताबाई नगर अमळनेर हे आयशर गाडीने शिरसमणी ता पारोळा येथे जात असताना आयशर समोर अचानक रस्त्यावर पाणी मारणारे टँकर येऊन उभे राहिल्याने आयशर चालक सुदाम पाटील याने जोराने ब्रेक मारला. म्हणून युवराज मोरे टँकर चालकाला टँकर हळू चालव असे सांगितले. त्याचा राग आल्याने टँकर चालक तसेच मुकेश संजय ठाकरे , संजय रुपचंद ठाकरे , अमोल नाना पाटील रा खोकरपाट ता अमळनेर यांनी चौघांनी युवराज मोरे व त्यांचा भाऊ सुरेश याना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून काठीला लावलेल्या लोखंडी पट्टीने दोघांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले.
युवराज मोरे यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून चौघा आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१) ,११५(२) , ३५१(२) ,३५२ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल राजेंद्र देशमाने करीत आहेत.




