
अमळनेर : उष्टे खरकटे पाणी फेकल्याचे बोलल्यावरून तिघांनी तीक्ष्ण हत्याराने तसेच विटांनी मारहाण करून तिघांना जखमी केल्याची घटना ६ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.

अतुल सुरेश कोळी रा गांधली यांनी फिर्याद दिली की ते ६ रोजी रात्री म्हशींना चारा पाणी करण्यासाठी गोठ्यात गेला असता गोठ्या शेजारी राहणारे संगीता संतोष पाटील या घराबाहेर भांडी घासत असताना खरकटे पाणी अतुलच्या अंगावर फेकले. अतुल त्यांना बोलायला गेला असता त्यांनी आमची जागा आहे असे म्हणत शिवीगाळ केली. म्हणून अतुलने घरी जाऊन आई वडील भाऊ वहिनी याना घटना सांगितली. रात्री नऊ वाजता त्यांना समजवायला गेले असता महिलेचा पती संतोष दोधु पाटील मुलगा जयेश संतोष पाटील व संगीता यांनी शिवीगाळ व चापट बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्यावेळी जयेश संतोष पाटील याने काहीतरी तीक्ष्ण हत्याराने अतुल व त्याचा भाऊ नवल कोळी याना दोघांना मारल्याने ते जखमी होऊन खाली पडले. आणि संगीता हिने अतुलच्या वहिनीला विटांनी मारहाण केली. तिघांनी दवाखान्यात उपचार घेतल्यानन्तर अमळनेर पोलीस स्टेशनला ११८(१), ११५(२) ,३५१(२) ,३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.




