कृषी उपसंचालकाच्या हस्ते बियाण्यांच्या किटचे वितरण…
अमळनेर:- तालुक्यातील सडावण येथे दि.२९ जून रोजी कृषी संजीवनी मोहीम सप्ताह विविध मान्यवर व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
यावेळी कृषी उपसंचालक फुलसुंदर (आयुक्तालय पुणे), उपसंचालक भोकरे (जळगाव) उपविभागीय कृषी अधिकारी जाधवर, मोहीम अधिकारी विजय पवार, तालुका कृषी अधिकारी भरत वारे, मंडळ कृषी अधिकारी मयूर कचरे,कृषी पर्यवेक्षक अविनाश खैरनार, आत्मा बी. टी. एम भूषण पाटील,कृषी सहायक राजेश बोरसे, आर.एच. पवार, राहुल पाटील, समुह सहायक तसेच सरपंच रत्नाबाई भिल, ग्राप सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर वेळी कृषी उपसंचालक फुलसुंदर यांनी कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत खरीप हंगाम 2022 मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच कृषी उपसंचालक जिल्हा अधीक्षक अनिल भोकरे यांनी व उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधवर यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेडनेट हाऊस मधील समस्या व शेतकऱ्यांच्या विविध शंका बाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी कृषी विषयक विविध योजना, कृषी विषयक सल्ला याबाबत अधिक माहितीसाठी कृषिक ॲप डाऊनलोड करणे बाबत आवाहन केले व खरीप हंगामासाठी उपस्थित सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच तुर बियाणे मिनी कीट वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महिला प्रगतशील शेतकरी कल्पनाताई यांनी निंबोळी अर्क व दशपर्णी अर्क तयार करणे व वापर या विषयावर शेतकरयांना मार्गदर्शन केले तसेच पंकज बाळू पाटील, कैलास दगा पाटील,योगेश केशव पाटील, लोटन मच्छिंद्रनाथ पाटील, विलास महादू पाटील, रमाकांत नामदेव पाटील वरील प्रगतशील शेतकरी यांनी शेडनेट गृह या विषयावर शेतकरयांना सखोल मार्गदर्शन केले. विजय पवार यांनी शेतकरयांना बियाणे खरेदी, खत व्यवस्थापन एकात्मिक किड रोग व्यवस्थापन यावर थोडक्यात मार्गदर्शन केले. भूषण पाटील यांनी आत्मा अंतर्गत गट स्थापन करणे व गटामार्फत लाभ घेता येणाऱ्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाअंती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेडनेट घटक लाभार्थी अमोल जिजाबराव पाटील यांच्या शेडनेट गृह मध्ये प्रत्यक्ष भेट देण्यात आली व माहिती घेण्यात आली. तसेच कोळपिंप्री येथील सृष्टी एंटरप्राइजेस कृषिभूषण सतीश काटे यांच्या सेंद्रिय कृषी उत्पादने निर्माण करणारे प्रकल्पास भेट देऊन माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मौजे मंगरूळ येथील क्वाटो ऍग्रो वर्ड प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत लेमन ग्रास प्रोसेसिंग प्लांट भेट देऊन माहिती घेण्यात आली.सदर कार्यक्रम राबविताना गुलाब पाटील, श्रीकांत पाटील, दिलीप पाटील, प्रताप मोतिराले, सुकदेव पाटील यांचे सहकार्य लाभले.