
विविध ग्रह, ताऱ्यांची विद्यार्थ्यांनी घेतली अनुभूती…
अमळनेर:- शहरातील मुंदडा फाऊंडेशन संचलित श्री एन टी मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूल येथे दिनांक 23 जुलै शनिवार रोजी ब्ल्यू स्टार प्लॅनेटेरियम यांनी खगोलीय तारांगण कार्यक्रमाचे आयोजन करत इयत्ता 3री ते इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना तारांगण दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांना प्लॅनेट, स्काय, अर्थ, सन, मुन, सोलार सिस्टम व स्टार्स इत्यादी बद्दल माहिती देण्यात आली. त्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सदर तारांगण कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल व विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश मुंदडा, चेअरपर्सन छाया मुंदडा, सचिव अमेय मुंदडा, सहसचिव योगेश मुंदडा, दीपिका अमेय मुंदडा, प्राचार्य लक्ष्मण सर, प्रायमरी प्राचार्या विद्या लक्ष्मण, प्री-प्रायमरी को-ऑडिनेटर योजना ठक्कर, सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शो आयोजन करणाऱ्या मान्यवरांचे आभार मानले.




