
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथे सट्टा जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकत कारवाई केली असून एकास ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोपनीय माहिती मिळाल्यामुळे मारवड पोलिसांच्या पथकाने मांडळ येथे छापा टाकला असता राहुल सुक्रम भोई हा जुगाराच्या साहित्यासह रंगेहाथ मिळून आला. तर पुंडलिक निंबा कोळी व गणेश रमण भील हे दोन्ही पोलिसांची चाहूल लागल्याने पळून गेले. सदर ठिकाणावरून ७४० रूपये व सट्टा लिहण्याची वही व साहित्य मिळून आले असून तिन्ही आरोपींविरुद्ध मु. जू. अँक्ट १२ अ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.







