आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिले निवेदन…
अमळनेर:- महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना आणि आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांची त्यांच्या पाळधी येथील निवासस्थानी भेट घेऊन निवेदन दिले आणि मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली.
सदर चर्चेत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करीत असून त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मंजूर करण्याच्या दृष्टीने शासन पाऊल उचलत आहे असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात रामकृष्ण पाटील यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी प्रतिनिधी श्रीमती उज्वला पाटील, नंदा देवरे,आशा जाधव, उषा पाटील, माधुरी पाटील, निता सुरवाडे, नंदा धोबी, शोभा खैरनार, कल्पना पाटील तसेच आशा स्वयंसेविका प्रतिनिधी माया खैरनार, सुनंदा पाटील, कल्पना भोई, कल्पना पाटील आणि गटप्रवर्तक प्रतिनिधी संगिता पाटील,अनिता पाटील, मनिषा पाटील, सुनंदा पाटील यांनी सहभाग घेतला.