सत्यशोधक समाजावर वक्तृत्व स्पर्धेचे केले होते आयोजन…
अमळनेर:- सत्यशोधक समाजाला 150 वर्षे पूर्ण होत आहे. जिल्हा परिषद माध्यमिक जळगाव यांच्या आदेशानुसार देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये सत्यशोधक स्थापना दिनानिमित्ताने महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर व सत्यशोधक समाजावर वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
व्यासपीठावर मुख्याध्यापक अनिल महाजन, सांस्कृतीक विभाग प्रमुख आय.आर.महाजन, क्रिडा शिक्षक अरविंद सोनटक्के, स्काऊट शिक्षक एस.के.महाजन, एच.ओ.माळी होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते. कार्यक्रमाची सुरवात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून माल्यार्पण करण्यात आले. इयत्ता आठवी ते दहावीतील विस विद्यार्थ्यांनीं मनोगत व्यक्त केले. परीक्षक म्हणून एच ओ.माळी यांनी काम पाहिले. वत्कृत्व स्पर्धेत प्रथम- श्वेता बैसाणे, द्वितीय -प्रणाली महाजन, तनूजा पाटील, स्नेहल पाटील इयत्ता दहावी तर तृतीय रागिणी पाटील मयुरी महाजन, सोनाली महाजन, उन्नती गायकवाड इयत्ता आठवी, उत्तेजनार्थ जयश्री पाटील नववी, राजश्री पाटील दहावी यांना कार्यक्रमात बक्षीस दिले जाणार आहे. शाळेचे शिक्षक अरविंद सोनटक्के, एच.ओ. माळी, एस.के. महाजन यांनी सत्यशोधक समाजाबद्दल मनोगत व्यक्त करत महात्मा फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. भाषणातून मुख्याध्यापक अनिल महाजन म्हणाले की समाज वर्णव्यवस्थेमध्ये विखूरला गेला होता. महात्मा फुले यांनी गुलामगिरी पुस्तकातून समाजातील दयनीय अवस्थेचे वर्णन करत समाजाची प्रगती होण्यासाठी खालच्या वर्गाची बुद्धीमत्ता, नैतिकता, प्रगती आणी समृद्धीचा विकास करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्यांनी समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले असे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ईश्वर महाजन यांनी केले. तर आभार एस.के.महाजन यांनी मानले.