
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय विद्यार्थी विकास विभाग यांच्या विद्यमाने मारवड महाविद्यालयत दिनांक १२ ऑक्टोबर रोजी विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्र मारवड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ निखिल पाटील व तिडके सिस्टर यांनी उपस्थित राहून एकूण ९३ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. तसेच डाॅक्टर पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगताद्वारे प्राचार्य डॉ देसले सर यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक जाणीव व जागृती करून दिली. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी विकास अधिकारी डॉ संजय पाटील यांनी प्रास्ताविकाद्वारे विद्यार्थी वैद्यकीय शिबिराद्वारे विद्यापीठाचा किती व्यापक दृष्टिकोन आहे यावर प्रकाश टाकणारे विचार मांडलेत. प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु. यास्मिन पठाणने केले व आभार कु.स्वाती चौधरीने मानले. सदर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.








