
न्यायालयाने सुनावली तीन दिवसांची पोलीस कोठडी…
अमळनेर:- शहरातील झामी चौक भागात झालेल्या दंगल प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून अजून अनेकांची नावे उघड होणार आहेत.

रियाझ बागवान, विशाल चौधरी व धनंजय पाटील यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अजून अनेक आरोपींना लवकरच होण्याची शक्यता आहे.








