
तालुक्यातील मारवड येथील तांबोळा नाल्यावर बांधला वनराई बंधारा…
अमळनेर:- अमळनेर येथील कृषी विभागातर्फे अनोखा लोकोपयोगी उपक्रम राबवत कर्मचारी व शेतकऱ्यांनी मिळून श्रमदान करत वनराई बंधारा बांधला आहे.

दिनांक १९ ऑक्टोबर रोजी मारवड येथील प्रगतीशील शेतकरी प्रभाकर मुरलीधर पाटील यांच्या शेताजवळील तांबोळा नाल्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे सर्व कर्मचारी व शेतकरी एकत्रित प्रयत्नांनी हा उपक्रम राबविण्यात आला. कृषी विभागातर्फे श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्याचा हा अनोखा उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात आला असून कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी दादाराव जाधवर व तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी मयूर कचरे, कृषी पर्यवेक्षक योगेश वंजारी, दीपक चौधरी, प्रवीण पाटील,योगेश कदम, अविनाश खैरनार, कृषी सहाय्यक आर एच पवार, दिनेश पाटील, योगेश खैरनार, अजय पवार, महेंद्र पवार, अनिकेत सूर्यवंशी, किरण पाटील, निलेश पाटील, अमोल कोठावदे, सतीश वानखेडे, राजेश बोरसे, महिला कृषी सहाय्यक नलिनी पाटील, पुनम पाटील, निशा सोनवणे, विद्या पाटील, सुप्रिया पाटील, कविता बोरसे, मालू बेडसे, श्रीमती लांडगे, श्रीमती पिंजारी, व नवल वाघ यांच्यासह गावातील शेतकरी हर्षल साळुंखे ,राकेश निळ, जितेंद्र पाटील, रमेश साळुंखे व इतर शेतकऱ्यांनी उपस्थित राहून त्यांनी श्रमदान केले. तालुक्यातून सर्वत्र या प्रथमच राबविल्या गेलेल्या संकल्पनेचे व उपक्रमाचे कौतुक होत आहे.
