
अमळनेर:- सकाळी फिरायला जाणाऱ्या महिलेला धाक दाखवून सोन्याची पोत खेचून चोरट्यांनी चारचाकीने पोबारा केला आहे.

आज दिनांक १४ रोजी पहाटे शहरातील रामलाल बाबूलाल पाटील व रंजनाबाई रामलाल पाटील हे दांपत्य नेहमीप्रमाणे फिरायला गेले असता आर के नगर जवळ त्यांच्या मागून येवून ओम्नी वाहन थांबले. त्यातून तीन जणांनी उतरत चाकूचा धाक दाखवून रंजनाबाई यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम सोन्याची पोत खेचून पोबारा केला. त्यांचा मुलगा दीपक पाटील यांनी ऑन लाईन तक्रार दाखल केल्याची माहिती आहे





