प्रज्ञावंतांचा सत्कार व तज्ञ मंडळीनी केले शेतीविषयक मार्गदर्शन…
अमळनेर:- तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथे संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष व बळीराजा ॲग्रो एजन्सीचे संचालक किरण सुर्यवंशी यांच्या तर्फे शेतकरी व गुणवंतांचा सत्कार सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
गेल्या तीन वर्षापासून विविध क्षेत्रातील गुणवंत, नामवंत आणि प्रज्ञावंत व्यक्तींचा गौरव या सोहळ्यात करण्यात येतो. शेतीविषयक कार्यक्रमामुळे मोफत कार्यशाळा तसेच वृक्ष संवर्धन आणि शेती पिकाचे व्यवस्थापन यावर चर्चासत्रचे आयोजन तसेच गावातील शैक्षणिक वैद्यकीय आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेवा करण्याचा गौरव तसेच शैक्षणिक क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी करण्याचा गुणवंत प्रज्ञावंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचा गुणगौरव सोहळा व विविध समाज कल्याणकारी आणि शेतीशी निगडित उन्नत शेती विषयक कार्यशाळेचे आयोजन या कार्यक्रमात केले जाते. महात्मा बळीराजा सन्मान सोहळा 2022 -23 च्या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवश्री व्याख्याते डॉ.प्रा. लीलाधर पाटील तसेच मराठा समाज मंडळ अध्यक्ष जयवंतराव पाटील, विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे श्याम पाटील, मुडीचे माजी सरपंच नानासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा.डॉ.लीलाधर पाटील यांनी महात्मा बळीराजा यांच्या विषयी असलेल्या पौराणिक कथा मधील संदर्भ आणि व्यक्ती वास्तविक जीवनातील बळीराजा यांचे लोकोपयोगी कार्य यावर अनमोल असे मार्गदर्शन केले. शाश्वत शेती आणि वृक्ष संवर्धन काळाची गरज या विषयावर साहेबराव पाटील यांनी अनेक शासन शासनाच्या कल्याणकारी योजना आणि शेतकरी वर्गास उपयुक्त ठरणाऱ्या मोहगणी या वृक्ष लागवड संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी प्रा डॉ ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्या गावांजली या स्वलिखित काव्यसंग्रहाचे प्रकाशन माजी आमदार साहेबराव पाटील, श्याम पाटील,प्राध्यापक लीलाधर पाटील, जयवंत पाटील, संजीव पाटील, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष व बळीराजा ॲग्रोचे किरण सूर्यवंशी, तुषार सैंदाणे यांच्या हस्ते करण्यात आले पांझरा परिसरातील विविध क्षेत्रातील नामवंत गुणवंत आणि प्रज्ञावंत व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या अलौकिक कार्याचा सन्मान व्हावा बळीराजा ऍग्रो समूहातर्फे गेल्या चार वर्षापासून बळीराजा ॲग्रो समूहमार्फत शेती आणि शेतीशी निगडित जोडधंदा यावर अनेक मान्यवर तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन तसेच महात्मा बळीराजा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. विविध तज्ञ मंडळीचे शेती विषयक मार्गदर्शन आणि वृक्ष लागवड आणि वृक्षाची जतन या बळीराजा ग्रुप समूहाचा भर असतो.
नवरात्री उत्सव दरम्यान एका नवजात अभ्रकाचे आणि गरोदर माताचे प्राण वाचून गरोदर माता आणि नवजात अर्बन यांच्या यशस्वीपणे प्रसूती तंत्रज्ञान वापरून जीवनदान देणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचारी सुनीता तुषार सैदाणे यांचा सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन आरोग्य सेवा सन्मान पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
शेतीत आपल्या मालकाचा खांद्याला खांदा लावून राब राब राबणारे राजाभाऊ चित्ते या 75 व्या वर्षी ही शेतीची कामे इमाने इतवारी प्रामाणिकपणे करणाऱ्या शेतकरी राजाच्या सन्मान साहेबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. गोरगरिबांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन त्यांना उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या डॉ सुरेश जैन यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. गोदरेज कंपनीच्या उद्योगसमूहात गेल्या वीस वर्षापासून विविध पदावर बढती होत आपल्या गावाचे नाव नामांकित कंपनीच्या उत्कृष्ट कर्मचारी म्हणून दीपक सूर्यवंशी यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच विविध विषयांमध्ये पारंगत होऊन शैक्षणिक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या स्नेहल सूर्यवंशी, डिंपल सोनवणे तसेच सानिका सूर्यवंशी यांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बीएससी ऍग्रीचे शिक्षण घेऊन कॅनरा बँकेत एग्रीकल्चर ऑफिसर म्हणून कार्यरत असणाऱ्या सुदर्शन जगदीश पाटील यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव पाटील, दयाराम पाटील तसेच तुषार सैंदाणे यांनी केले. नंतर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व गावकरी व मित्रपरिवार यांचे आभार बळीराजा ॲग्रोचे संचालक किरण नानासाहेब सूर्यवंशी यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.