
मुख्याध्यापक संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात होणार सन्मान…
अमळनेर:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने सानेगुरुजी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर झाला आहे.
अमळनेर तालुक्याला १५ वर्षानंतर व प्रथमच महिलेला हा पुरस्कार मिळाला आहे. ६ व ७ नोव्हेंबर रोजी मुख्याध्यापक संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात अहमदनगर येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. अनिता बोरसे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष जे के पाटील, तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, शिक्षक भारताचे जिल्हा कार्याध्यक्ष आर जे पाटील, टीडीएफचे तालुकाध्यक्ष सुशील भदाणे, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील, जुनी पेन्शन योजना संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रभूदास पाटील , क्रीडा संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील वाघ, सानेगुरुजी पतपेढीचे सचिव तुषार बोरसे यांनी स्वागत केले आहे.







