
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मा.आ. साहेबराव पाटील यांचीही उपस्थिती…
अमळनेर:- बाळासाहेबांची शिवसेना अमळनेर कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. या कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरिबांची कामे व्हावीत अशी अपेक्षा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.

जळगाव जिल्ह्यात कार्यालय उघडण्याच्या पहिला मान अमळनेरने पटकावला असे गौरवोद्गार गुलाबराव पाटलांनी काढले. भागवत रोडवरील खड्डाजीन मधील बाळासाहेबांचे शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले यावेळी अमळनेर तालुक्याचे मा. आमदार साहेबराव दादा पाटील यांची उपस्थिती होती. समारंभाच्या प्रारंभी सुंदरपट्टीच्या माजी सरपंच सुरेखाबाई पाटील, माजी नगरसेविका रत्नमाला महाजन यांनी पालकमंत्र्यांचे औक्षण केले. पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. दीपक पाटील यांनी यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला. सुंदरपट्टीचे लोकनियुक्त सरपंच सुरेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक महेश देशमुख यांनी गुलाबराव पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी माजी नगरसेवक विक्रांत पाटील, झाडीचे सामाजिक कार्यकर्ते गुणवंत पाटील, सुंदरपट्टीचे उपसरपंच मधुकर पाटील, रडावनचे सरपंच डोमन आण्णा पाटील, लोणचे माजी सरपंच डॉ. रामराव पाटील, जानवेचे सुरेश पाटील, आर्डीचे उपसरपंच किशोर पाटील यासोबत पत्रकार बांधव व युवा वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यालयाची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मनोहर भांडारकर यांचे आभार यावेळी व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महेश देशमुख यांनी मानले.







