
आमदारांच्या नेतृत्वात काढला मोर्चा, घोषणाबाजी करत जोरदार निषेध…
अमळनेर:- कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा विरोधात अमळनेरात राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.

काल दिनांक ७ रोजी संध्याकाळी आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले. यावेळी महाराणा प्रताप चौकात येत मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून दहन करण्यात आले. याप्रसंगी आमदारांसह कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महिला पदाधिकाऱ्यांची ही यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यावेळी आमदार पाटील यांनी सांगितले की, “या सरकारने बेताल मंत्र्यावर २४ तासात कारवाई करावी. अन्यथा त्याचे जोरदार पडसाद राज्यभर उमटतील.” यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या तिलोत्तमा पाटील, जयश्री पाटील, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, एल टी पाटील, रंजना देशमुख, आशा चावरिया, डॉ. रामू पाटील, अशोक पवार, मुक्तार खाटीक, गौरव पाटील, सनी गायकवाड यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







